Wednesday, 4 July 2012

माझा पहिला ब्लॉग

नमस्कार!
आज माझ्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतो आहे. गेले बरेच दिवस अंतर्जालावर वावरतो आहे, लिहिण्यासाठी हात शिवशिवत होते, पण उद्योगातून वेळ मिळायला हवा ना ! कोणत्याही प्रकारचे अशैक्षणिक लिखाण करून बरेच दिवस (वर्षे !) होऊन गेली. दिसामाजी काहीतरी लिहित जावे असे म्हणतात, जेव्हा आपण आपलेच पूर्वीचे लिखाण वाचतो तेव्हा आपला वैचारिक प्रवास दिसून येतो. हे फोटो सारखेच आहे, काढतांना त्याचे महत्व वाटले नाही तरी मागे वळून पाहतांना त्याचे मूल्य कळून येते. म्हणून आज ठरवून आरंभ करतो आहे. माझ्या लिखाणाला कोणताही विषय वर्ज्य नाही तशीच भाषाही. मायमराठीवर विशेष प्रेम असले तरी आंग्लभाषेतही  वेगळी जादू आहे. असो.  विचार हे वेळोवेळी उत्क्रांत होत असतात. आपण आधी व्यक्त केलेले विचार हि आपली मालमत्ता नसते तसेच, आपण विचारांना बांधीलही नसतो. सर्व प्रकारच्या संवादांचे स्वागतच आहे.

- Mayur